PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 3, 2024   

PostImage

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमकित 9 नक्षली ठार


hhattisgarh Naxalites killed : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता आजही(दि.3) छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील लोहगाव पेडियाच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार(3 सप्टेंबर) रोजी सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम राबवली होती. यादरम्यान त्यांना पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर सकाळी 10.30 वाजता चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून, घटनास्थळावरुन एसएलआर, 303 आणि 12 बोअरची शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला आहे.

 

 
Chhattisgarh Naxalites killed : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता आजही(दि.3) छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील लोहगाव पेडियाच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार(3 सप्टेंबर) रोजी सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम राबवली होती. यादरम्यान त्यांना पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर सकाळी 10.30 वाजता चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून, घटनास्थळावरुन एसएलआर, 303 आणि 12 बोअरची शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला आहे.

  

यापूर्वी 3 नक्षलवादी ठार यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी नारायणपूर-कांकेर सीमेवर नक्षलविरोधी अभियानांतर्गत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. दरम्यान, ऑगस्टमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून अनेक नक्षलवाद्यांना पकडले, तर अनेकांना ठारही केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही दंतेवाडा पोलिसांना मोठे यश मिळाले होते. चकमकीत एक कट्टर नक्षलवादी ठार झाला होता. 

65 नक्षलवादी लपून बसल्याचा संशय अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5 ते 7 किमीच्या परिसरात सूमारे 65 नक्षलवादी लपून बसल्याचा संशय आहे. सध्या या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, शोध मोहिम राबवली जात आहे. विशेष म्हणजे, बस्तर प्रदेशात दंतेवाडा आणि विजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, या वर्षात आतापर्यंत छत्तीसगडमध्ये विविध चकमकीत सुरक्षा दलांनी 154 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 30, 2024   

PostImage

पुन्हा 7 नक्षली ठार


नारायणपूर, दि. 30 : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूरच्या अबुझमाड परिसरात आज मंगळवार 30 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये 22 महिला नक्षलींचा समावेश आहे. घटनास्थळावरुन एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली असून चकमकीनंतर परिसरात शोध सुरु असल्याचे कळते.

 

अबुझमाडच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षली उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे सोमवारी रात्री उशिरा जवान शोधमोहीम करिता निघाले असता मंगळवारी सकाळी जवान या भागात पोहोचले असता नक्षल्यांनी जवानांवर अंधधुंद गोळीबार केला. जवानांनी मोर्चा सांभाळत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 7 नक्षली ठार झाले त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

 

सदर चकमक महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा सीमेलगत असलेल्या परिसरात घडली असून. पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024   

PostImage

पोलिसांशी चकमकीत 3 नक्षली ठार


 

रायपूर, . छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन नक्षली ठार झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी चकमक स्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलिस आणि डीआरजीच्या पथकाने शोधमोहीम चालवली होती. कोयलीबेडाच्या दक्षिण भागामध्ये ही चकमक झाली. याच जंगलांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. कांकेरचे एसपी आय.के. एलेसेला यांनी

 

या चकमकीच्या घटनेला दुजोरा दिला. आहे. जिल्हा राखीव गार्ड आणि सीमा सुरक्षा नक्षलविरोधी दलाच्या नेतृत्वाखाली मोहिमेदरम्यान कोयालीबेडा येथील जंगल परिसरात ही चकमक झाली. अंतागढमधील हुरतरईच्या जंगलात दोन तास ही चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांना तीन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. ही कारवाई बीएसएफ आणि जिल्हा पोलिस पथकाने केली. दरम्यान, तीनही नक्षल्यांची ओळख पटली नव्हती.